आयसीसी टी २० वर्ल्ड कप, विजेत्यांवर बक्षिसांची बरसात

यंदाच्या आयसीसी टी २० वर्ल्ड कप मध्ये विजेत्या संघांवर बक्षिसाची जणू बरसात होणार आहे. आयसीसी टी २० वर्ल्ड कप आता अगदी तोंडावर आला असून पाच वर्षांच्या कालावधीनंतर ही स्पर्धा युएई, ओमान येथे होत आहे. त्यासाठी विविध देशांचे संघ येथे जमू लागले असतानाच आयसीसीने सुद्धा स्पर्धेची सर्व तयारी केली आहे. रविवारी या संदर्भात घोषणा करताना आयसीसीने इनामी राशींची घोषणा सुद्धा केली आहे.

यावेळी वर्ल्ड कप विजेत्या संघाला १.६ मिलियन डॉलर्स म्हणजे १२ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार असून उपविजेत्यांना ८ लाख डॉलर्स म्हणजे ६ कोटी रुपये मिळणार आहेत. उपांत्य फेरीतील संघाना ३ कोटी तर सुपरस्टेज मध्ये प्रत्येक सामना जिंकल्यावर संघाना बोनस मिळणार आहे. या स्पर्धा १७ ऑक्टोबरला सुरु होत असून पहिला सामना ओमान आणि पापुआ न्यू गिनी मध्ये होणार आहे. अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

या स्पर्धेचा आयोजक भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान बरोबर, ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध, ३ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत एकूण १६ टीम असून टीम इंडिया ग्रुप दोन मध्ये आहे.