घटस्फोट घेतला आणि महाराणीपेक्षा श्रीमंत झाली ही ब्युटीक्वीन

मिस युके, मिस वल्ड रनर अप, क्रिस्टी बर्टारेली वयाच्या पन्नाशी मध्ये पुन्हा एकदा लाइमलाईट मध्ये आली आहे. मात्र यावेळी ती वेगळ्याच कारणाने चर्चेत असून हे कारण आहे तिने घेतलेला घटस्फोट. क्रिस्टीचा हा घटस्फोट सामान्य नाही कारण या घटस्फोटा बद्दल तिला मिळालेल्या रकमेमुळे ती ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्यापेक्षा श्रीमंत बनली आहे.

सौंदर्य, नाव, प्रसिद्धी आणि श्रीमंती एकाच वेळी साऱ्या गोष्टी मिळणे म्हणजे सौभाग्यच. या दृष्टीने क्रिस्टी सुदैवी म्हणावी लागेल. ब्रिटनची ही ब्युटी क्वीन आजही जगभर घटस्फोटामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. पती अर्मेस्टो यांच्याबरोबर २० वर्षे संसार केल्यावर ते आता विभक्त झाले आहेत. क्रिस्टी केवळ ब्युटी क्वीन नाही तर ती मॉडेल, पॉपसिंगर म्हणूनही प्रसिद्ध असून तिचा चाहता वर्ग मोठा आहे. पती अर्मेस्टो यांच्यापासून वेगळे झाल्यावर क्रिस्टीला ३५० दशलक्ष पौंड रक्कम मिळाली आहे. जुलै मध्ये लग्नाचा २० वा वाढदिवस या जोडप्याने साजरा केला होता. त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर झळकले होते. या दोघांनी कोणताही गाजावाजा न करता घटस्फोट घेतला असे सांगितले जाते.

घटस्फोट प्रकरणात मिळालेल्या रकमेमुळे क्रिस्टीची संपत्ती ४०० दशलक्ष पौंडापेक्षा अधिक झाली असून ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची संपत्ती ३६० दशलक्ष पौंड आहे असे समजते. क्रिस्टीचे पती अर्मेस्टो स्वित्झर्लंड मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून हे दोघे सुट्टी ज्या त्यांच्या याटवर घालवत त्या याटच्या इंधनाचा खर्चच अडीच लाख डॉलर्स होता असे समजते. अर्मेस्टो यांची स्वीस फार्मा टायकून अशी जगाला ओळख आहे. क्रिस्टी आता सर्वात श्रीमंत ब्रिटीश घटस्फोटीता बनली आहे.