महसूल गुप्तचर संचालनालयाने नवी मुंबईतून जप्त केली तब्बल १२५ कोटींचे हेरॉईन


नवी दिल्ली – केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी रविवारी अटक केली. राज्यभरात या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान ड्रग्ज प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.

त्यानंतर आता तब्बल १२५ कोटींचे हेरॉईन नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरातून जप्त करण्यात आले आहे. ही मोठी कारवाई महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने (DRI) केली आहे. २५ किलोहून अधिक हेरॉईन न्हावा शेवा बंदरातील एका कंटेनरमधून जप्त करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईदरम्यान एका व्यवसायिकाला अटक करण्यात आली असून ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

यापुर्वी सात किलो हेरॉईननसहीत दोन जणांना अमंतलीपदार्थ विरोधी पथकाच्या मुंबईमधील तुकडीने ताब्यात घेतले आहे. मुंबईमधील डोंगरी भागामध्ये ही कारवाई करण्यात आली असून ताब्यात घेण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये १५ कोटी रुपये एवढी आहे.