राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी जावेद अख्तर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल


मुंबई – मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष दुबे या वकिलाच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जावेद अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संघाची तुलना तालिबान्यांशी केल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे. मुलुंड परिसरात राहणारे वकील संतोष दुबे यांनी याबाबत त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून तात्काळ माफी मागण्याची मागणी केली होती. पण अनेक दिवसांनंतर देखील अख्तर यांनी माफी न मागितल्यामुळे वकील संतोष दुबे यांनी काल जावेद अख्तर यांच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

याबाबत एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड पोलीस ठाण्यात स्थानिक प्रवक्ते संतोष दुबे यांच्या तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय दंड संहितेनुसार, कमल 500 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. आरएसएस विरोधात चुकीचे आणि अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी जावेद अख्तर यांना वकिलांकडून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. जावेद अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संघाची तुलना तालिबान्यांशी केल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान, तक्रारदारांनी काही दिवसांपूर्वी अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबान्यांशी केल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांना मुलुंड परिसरात राहणारे वकील संतोष दुबे यांनी कायदेशीर नोटीस पाठवून तात्काळ माफी मागण्याची मागणी केली होती. पण अख्तर यांनी अनेक दिवसांनंतर देखील माफी न मागितल्यामुळे सोमवारी वकील संतोष दुबे यांनी जावेद अख्तर यांच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली.