‘या’ 3 संशोधकांना जाहिर झाला यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार


स्टॉकहोम – आज तीन संशोधकांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार गुंतागुंतीची रचना समजावून सांगण्यासाठी विकसित केलेल्या तंत्राबद्दल देण्यात येणार आहे. पर्यावरण बदलासारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या रचनाही या संशोधनामुळे सोप्या भाषेत समजावून सांगता येऊ शकणार आहेत.

पृथ्वीवरील वातावरणाच्या बदलांविषयीचे भोतिक मॉडेल मूळचे जपानमधील असलेल्या सुकुरो मानाबे आणि जर्मनीतील हॅसेलमान यांनी मिळून विकसित केले आहे. ग्लोबल वॉर्मिंगसारख्या अत्यंत जटील विषयाला या मॉडेलच्या माध्यमातून समजावून सांगणे सोपे होणार आहे.

त्याचबरोबर इटलीच्या जॉर्जिओ पारिसी यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात येणार आहे. आण्विक ते ग्रहपातळीवरील चढउतारांचा अंतर्गत पातळीवर होणाऱ्या बदलांचा अभ्यास त्यांनी केला आहे. वातावरण हा एक प्रमुख विषय या तिन्ही संशोधकांच्या संशोधनामध्ये आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या रचना विषद करण्यात या संशोधकांचे संशोधन फायदेशीर होणार आहे.