स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकूण २०५६ पदांसाठी होणार नोकर भरती


नवी दिल्ली – भारतीय स्टेट बँकमध्ये (SBI) नोकरी शोधत असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रीय बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने देशभरात विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या त्याच्या विविध शाखांमध्ये प्रॉबेशनरी ऑफिसर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बँकेने सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१ रोजी जारी केलेल्या SBI PO 2021 अधिसूचनेनुसार पात्र उमेदवारांकडून एकूण २०५६ पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. आज, ५ ऑक्टोबर २०२१ पासून इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२१ आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट, sbi.co.in ला इच्छुक उमेदवारांनी भेट द्यावी आणि करिअर विभागात जावे. अर्ज प्रक्रियेअंतर्गत, उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर दिलेल्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करून, उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतील. उमेदवारांना एसबीआय पीओ २०२१ अर्जादरम्यान, बँकेकडून ७५० रुपये विहित अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.

एसबीआयने जारी केलेल्या प्रोबेशनरी ऑफिसर भर्ती अधिसूचनेनुसार, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवारांचे वय १ एप्रिल २०२१ रोजी २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. शासकीय नियमांनुसार वरच्या वयोमर्यादेत आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शिथिलता दिली जाते.