विरूची ‘कु’ एन्ट्री

टीम इंडियाचा माजी कप्तान आणि धुवाधार खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांनी भारताच्या बहुभाषिक मायक्रोब्लोगिंग प्लॅटफॉर्म ‘कु’ वर एन्ट्री घेतली आहे.@ वीरेंदर सेहवाग हँडल अॅप वर उपस्थिती जाहीर करताना विरूने ‘ कु किया रे, चेन्नई दिल्ली प्ले ऑफ एन्ट्री मारली आम्ही पण कु स्टेडियम मध्ये एन्ट्री मारली’ असा मजकूर कु केला आहे. यामुळे विरूच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

आगामी आयपीएल मध्ये विरूचे मजेदार रिव्ह्यू विरू स्वतःच ऑनलाईन सिरीजच्या माध्यमातून देणार आहे. सेहवागमुळे ‘कु’ युजर्स लाईव्ह क्रिकेट अॅक्शन, मॅच कॉमेंट्री भारतीय भाषेत ऐकण्याचा आनंद मिळवू शकणार आहेत. हा टी २० विश्वकप १७ ऑक्टोबर २०२१ पासून युएई आणि ओमान येथे सुरु होत आहे. सेहवागला यासाठी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

कु च्या प्रवक्त्यांनी सेहवागचे कु वर स्वागत केले आहे. ते म्हणतात क्रिकेट हा आमच्यासाठी फक्त एक खेळ नाही तर भावना आहे. भारतीय याच जगात जगतात आणि श्वास घेतात. सर्व भारतीयांना एकत्र जोडणारा हा धागा विविध संस्कृती आणि भाषा असल्या तरी अखंड आहे. कु बहुभाषी आहे आणि भारतीयांना त्यांच्या मायबोलीत व्यक्त होण्यासाठी सुरु केलेले एक मिशन म्हणून आम्ही त्याकडे पाहतो.