अमेरिकेचे शास्त्रज्ञ डेव्हिड ज्युलिअस आणि अर्डेम पटापाउटियन यांना औषधशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर


नवी दिल्ली : यावर्षीचा म्हणजे 2021 चा औषधशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार आज जाहीर झाला आहे. अमेरिकेचे शास्त्रज्ञ डेव्हिड ज्युलिअस आणि अर्डेम पटापाउटियन यांना हा पुरस्कार जाहीर झाले आहे.

तापमान आणि स्पर्शामधील रिसेप्टर्सच्या संशोधनासाठी अमेरिकेचे शास्त्रज्ञ डेव्हिड ज्युलिअस आणि अर्डेम पटापाउटियन यांना संयुक्तपणे नोबेल मेडिसीन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही घोषणा स्टॉकहोममधील करोलिंस्का संस्थेच्या एका पॅनेलद्वारे करण्यात आली आहे. मेडिसीनमध्ये हा पुरस्कार गेल्या वर्षी तीन शास्त्रज्ञांना देण्यात आला होता. सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार रक्तातील ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूमुळे होतात. या संशोधनासाठी गेल्या वर्षी या कॅटेगरीमध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.