तिरुअनंतपुरम : इस्रोमध्ये लवकरच तब्बल 167 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. ही भरती इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट अप्रेन्टिस या पदांसाठी असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 08 ऑक्टोबर 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
इस्रोमध्ये या 167 पदांसाठी नोकरी भरती
या पदांसाठी नोकर भरती
इंजिनिअरिंग अप्रेन्टिस (Engineering Apprentice)
मॅनेजमेंट अप्रेन्टिस (Management Apprentice)
एकूण जागा – 167
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
इंजिनिअरिंग अप्रेन्टिस – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित इंजिनिअरिंगच्या ब्रांचमध्ये 65% किंवा 6.84 CGPA इतके मार्क्स मिळवले असणे आवश्यक आहे. तसेच फुल टाइम इंजिनिअरिंग केले असणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार नाही.
मॅनेजमेंट अप्रेन्टिस – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित 60% गुणांसह हॉटेल मॅनेजमेंट किंवा कॅटरिंगची पदवी घेतली असणे आवश्यक आहे. तसेच मॅनेजमेंटमध्ये पूर्णवेळ शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
काही महत्त्वाच्या सूचना
- जानेवारी 2019 च्या आधी ज्या उमेदवारांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे, अशा उमेदवारांना या भरतीसाठी अप्लाय करता येणार नाही.
- केवळ भारतीय नागरिकांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
- तीस वर्षांची वयोमर्यादा भरतीसाठी असणार आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 35 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे. PWD उमेदवारांसाठी 10 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
- उमेदवार याआधी कुठली अप्रेंटीशीप करत असतील, तर अशा उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
- यासाठी उमेदवारांनी आपला सुरु असलेला ई-मेल आयडी, मोबाईल नंबर देणं अनिवार्य आहे.
या ठिकाणी कराल अर्ज
- www.vvsc.gov.in या वेबसाईटवर जाऊन या भरतीसाठी उमेदवार अर्ज करू शकतात.
यासाठी पुढील कागदपत्रे अनिवार्य
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- नॉन-किमीलेअर प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 ऑक्टोबर 2021
भरती संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://rmt.vssc.gov.in/GA2021/s.jsp या लिंकवर क्लिक करा.