आर्यनने सर्व वाईट गोष्टी कराव्यात, शाहरुखनेच व्यक्त केली होती इच्छा

बॉलीवूड किंग शाहरुख खान पुत्र आर्यन खान याला अमली पदार्थ प्रकरणात अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केल्यावर शाहरुखच्या समर्थनार्थ अनेक बॉलीवूड कलाकार शाहरुखच्या भेटीसाठी जाऊ लागले आहेत. पण या सर्व पार्श्वभूमीवर शाहरुखने १९९७ मध्ये सिमी गरेवाल टॉक शो मध्ये केलेले वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे.

बॉलीवूड मध्ये २५ वर्षाची झळाळती कारकीर्द असलेल्या ५५ वर्षीय शाहरुखचे चाहते करोडोंच्या संखेने आहेत. १४ फिल्म फेअर पुरस्कार, सन्मान्य पदमश्री खिताबचा मानकरी असलेल्या शाहरुखचे पदार्पण टीव्ही सिरीयल फौजी मधून झाले होते आणि आजघडीला त्याची कमाई वर्षाला ३०० कोटींच्या वर आहे. १९९७ मध्ये सिमी गरेवाल शो मध्ये शाहरुख आणि पत्नी गौरी याना बोलवले गेले होते तेव्हा आर्यनचा जन्म नुकताच झाला होता.

यावेळी बोलताना शाहरुख म्हणाला होता जे मला करणे जमले नाही त्या साऱ्या गोष्टी आर्यनने कराव्यात असे त्याला वाटते. त्याने ड्रग्स घ्यावीत, सेक्स करावा. तो चार वर्षाचा झाला की मुलींच्या मागे जाऊ शकतो. मी केले नाही ते सर्व त्याने लवकरात लवकर करावे असेही शाहरुख म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्याने सर्वाना चकित केले होते.