एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे वाचले 24 लाख बालकांचे प्राण


जेम्स हँरिसन हा व्यक्ती गेली 60 वर्षांपासून दर आठड्याला रक्तदान करत आहे. त्यांना मँन विथ द गोल्डन आर्म नावाने देखील ओळखले जाते. त्यांच्या रक्तदानामुळे आतापर्यंत 24 लाख बालकांचे प्राण वाचले आहेत.

हँरिसन यांचे रक्त विशेष आहे. त्यांच्या रक्ताचा वापर करून अँटी-डी नावाचे विशेष इंजेक्शन तयार केले जाते. या इंजेक्शनचा वापर रिसस नावाच्या आजारासाठी केला जातो. या आजारामध्ये गर्भवती स्त्रीच्या रक्तामधील घटक बाळाच्या रक्त पेक्षींना नुकसानकारक ठरू शकतात. गर्भात असणाऱ्या बाळांच्या मेंदूला इजा देखील होऊ शकते किंवा त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो.

डॉक्टर हँरिसन यांच्या रक्तातील प्लाझमा (रक्तातील द्रव) काढतात आणि रक्त पुन्हा त्यांच्या शरीरात चढवले जाते. याचमुळे ते दर आठवड्याला रक्त देऊ शकतात.

रक्ताची प्रत्येक पिशवी महत्त्वाची आहे. मात्र जेम्स यांचे रक्त विशेष असल्याचे रेड क्रॉस या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, जेम्स यांचे रक्त आयुष्यसाठी वरदान आहे. ज्या महिलांच्या रक्त पेक्षीमुळे गर्भातील बालकांवर परिणाम होऊ शकतो, अशा गर्भवती महिलांना त्यांचे रक्त दिले जाते.

ऑस्ट्रेलियात बनवण्यात आलेले अँटी-डी हे प्रत्येक इंजेक्शन जेम्स यांच्या रक्तापासून बनवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील 17 टक्के महिलांना धोका आहे. त्यामुळे जेम्स हँरिसन यांनी लाखो लोकांचे प्राण वाचवले असल्याचे देखील, ते म्हणाले.

Leave a Comment