पाकव्याप्त काश्मीरबद्दल संपुर्ण माहिती


भारताच्या फाळणीनंतर लगेचच पाकिस्तानने आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरूवात केली होती. काश्मीरला पाकिस्तानमध्ये घेण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र अखेर काहीच होत नसल्याने काश्मीरवर हल्ला करण्यात आला. जोपर्यंत राजा हरिसिंह विलिनिकरणाच्या कागदांवर सही करत होते तोपर्यंत पाकिस्तानने काश्मीरच्या मोठ्या भागावर ताबा मिळवला होता. आजही काश्मीरचा अर्धा भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे.

मीरपूर  शहर –
पाक व्याप्त काश्मीरमध्ये जम्मू-काश्मीरचे 6 पैकी 3 क्षेत्र येतात. पोठोहार क्षेत्राला आझाद काश्मीरचे नाव देत मुज्जफराबादला त्याची राजधानी घोषित करण्यात आले. यामध्ये मीरपूरचा संपुर्ण जिल्हा आणि पुंछ शहराला सोडून पुंछचा काही भाग आहे. मीरपूर पाकिस्तानसाठी खास आहे. येथे झेलम नदीवर मंगला धरण बांधण्यात आला आहे. या धरणाद्वारे पाकिस्तानला पाणी आणि वीज मिळते. येथून रावळपिंडी केवळ 100 किलोमीटर लांब आहे.

गिलगितला लागून चीन आणि अफगाणिस्तानची सीमा –
पाक व्याप्त काश्मीरचा दुसरा महत्त्वाचा भाग गिलगित आहे. याचे नाव गिलगित नदीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. पाक व्याप्त काश्मीरचा हा भाग चीन आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहे. पाककडून हा भाग ताब्यात घेतल्यामुळे भारताचे अफगाणिस्तानबरोबरील जमीनीद्वारे होणार संपर्क देखील तुटला आहे. याची सीमा चीनच्या सिक्यांग राज्याशी मिळते व येथूनच यारकंद शहराकडे जाणारा रस्ता जातो.

बलूचिस्तान –
गिलगितच्या पुर्वेला बलूचिस्तानचा भाग जनरल जोरावर सिंहने 1835 च्या दरम्यान लद्दाखबरोबर जोडला होता. आधी बलूचिस्तान हा लद्दाखचाच एक भाग होता. या ठिकाणाचे प्रमुख शहर आसकारदू आहे. बलूचिस्तानच्या 14 हजार वर्ग किलोमीटर भागापैकी 11 हजारवर पाकिस्तानचा ताबा आहे. पाकिस्तानने 1963 मध्ये बलूचिस्तान आणि गिलगितचा काही भाग भेट म्हणून दिला होता.

Leave a Comment