मीठ मिरपुडीच्या डब्यांचे अनोखे संग्रहालय

salt
कोणत्याही हॉटेल मध्ये जेवायला गेले कि टेबलवर ठेवलेल्या मीठ आणि मिरपुडीच्या छोट्या बाटल्या किंवा डब्या आपण पाहतो. विशेष लक्ष द्यावे अशी हि वस्तू नसेलही पण जेव्हा कुणी या बाटल्या अथवा डब्यांचा संग्रह करून त्याचे म्युझियम बनवितो तेव्हा ते नक्कीच प्रेक्षणीय असते याचा अनुभव सध्या इस्त्रायली जनता घेत आहे. इस्त्रायलच्या हेरन शहरात राहणाया एतन बारओंस यांनी अश्या प्रकारच्या ३७ हजार डब्यांच्या जोड्या जमविल्या असून त्याचे संग्रहालय केले आहे.

पुस्तके, प्राचीन वस्तू, दिवे, मूर्ती, घड्याळे, कुलुपे अश्या वस्तूंची संग्रहालये अनेक ठिकाणी आहेत मात्र मीठ आणि मिरपूड डब्यांचे संग्रहालय बहुदा प्रथमच बनविले गेले असावे. या संग्रहालयाला सॉल्ट अँड पेपर असेच नाव दिले गेले आहे.

pepper
इतक्या संखेने या डब्या जमविण्यासाठी एटन यांना ५८ वर्षे लागली आहेत. आपल्या संग्रहालयाच्या नवे वर्ल्ड रेकॉर्ड नोंदले जावे अशी त्यांची इच्छा असून हा संग्रह ते ४० हजार मीर मिरपूड डब्या जोड्यांवर नेणार आहेत आणि त्यानंतर थांबणार आहेत. यात सर्वात जुनी डबी जोडी १७०३ सालची असून सर्वात महाग जोडीची किंमत १७ हजार डॉलर्स म्हणजे १२ लाख रु. आहे. या संग्रहात ख्रिसमस ट्री, टॉयलेट सीट, विविध प्राणी, पारंपारिक वेशातील मनुष्य आकृत्या आहेतच पण सिरामिक मधील क्वीन एलिझाबेथ आणि तिचा कुत्रा यांच्या आकृत्या असलेल्या डब्याही आहेत.

Leave a Comment