देशातील कोरोना लसीकरण मोहिमेने ओलांडला ९० कोटींचा टप्पा


नवी दिल्ली: देशात आतापर्यंत ९० कोटी २६ लाख ७५ हजार १७८ कोरोना प्रतिबंधक डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत ६५ कोटी ७८ लाख ३५ हजार ६८३ जणांना लसीचा पहिला डोस तर २४ कोटी ४८ लाख ३९ हजार ४९५ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये देशातील सर्वाधिक लसीकरण झाले. लसीकरणात दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. उत्तर प्रदेशमध्ये १० कोटी ९१ लाख ४ हजार ६४८ कोरोना प्रतिबंधक डोस देण्यात आले आहेत. तर महाराष्ट्रात ८ कोटी ३३ लाख ६४ हजार ३२६ कोरोना प्रतिबंधक डोस देण्यात आले. मध्य प्रदेशमध्ये ६ कोटी ३८ लाख ८२ हजार ४९२, तर गुजरातमध्ये ६ कोटी १३ लाख ६५ हजार ८६५ कोरोना प्रतिबंधक डोस देण्यात आले.

आतापर्यंत देशात आढळलेल्या ३ कोटी ३७ लाख ९१ हजार ६१ कोरोनाबाधितांपैकी ३ कोटी ३० लाख ६८ हजार ५९९ जण बरे झाले. कोरोनामुळे देशात ४ लाख ४८ हजार ६०५ मृत्यू झाले. भारतात २ लाख ७३ हजार ८५७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.