महाट्रान्सकोमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी


चंद्रपुर : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड चंद्रपुर येथे लवकरच नोकरभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना काही दिवसांपूर्वीच जारी करण्यात आली आहे. ही नोकरभरती अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) या पदांसाठी असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या नोकरभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी नोकरभरती
अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) – एकूण जागा 30

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) – या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
उमेदवारांचे वय या पदासाठी 18 ते 33 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

 • दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
 • ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
 • महाराष्ट्र राज्याचे डोमिसाईल प्रमाणपत्र
 • नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र
 • हे सर्व प्रमाणपत्र उमेदवारांनी ऑनलाईन स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.

काही महत्वाच्या सूचना

 • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना कागपत्रांच्या सर्व स्कॅन कॉपीज व्यवस्थित स्थितीत अपलोड करणे आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी अर्ज करताना स्वतःचा सध्या चालू असला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी देणे आवश्यक आहे.
 • या पदभरतीसाठी उमेदवारांची निवड दहावी आणि ITI च्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.
 • आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑक्टोबर 2021