डॉजी एक्स ९६ स्मार्टफोन ११ ऑक्टोबरला येणार

डॉजी एक्स ९३ आणि व्ही १० स्मार्टफोन नंतर नवा स्मार्टफोन डॉजी एक्स ९६ आणण्याच्या तयारीत असून हा एन्ट्री लेव्हल, लो कॉस्ट स्मार्टफोन असेल. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी हा फोन सादर केला जात आहे.

या स्मार्टफोन साठी ६.५२ इंची डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सह आहे आणि या नॉच मध्येच ५ एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. फोनचे डिझाईन अतिशय आकर्षक असून ९१ टक्के उच्च स्क्रीन टू बॉडी रेशो आहे. फोन साठी तीन नेव्हिगेशन सिस्टीम असून ड्युअल सीम स्लॉट प्लस टीएफ कार्ड आहे. मधुर संगीत ऐकण्यासाठी ऑडीओ हेडफोन जॅक, अँड्राईड ११ गो ओएस, रिअर १३+२+२+२ चा कॅमेरा सेट आहे. ४ जीबी रॅम व ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे.

या फोन मध्ये एक ऑक्टाकोर प्रोसेसर सह युनीसोक एससी ९८६३ए एसओएस आहे. हे टीएफ कार्डच्या माध्यमातून २५६ जीबी एक्स्पेंडेबल स्टोरेजसह २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज बंडल करते. फोन साठी ५४०० एमएएचची फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी बॅटरी दिली गेली आहे. फोनचे प्री बुकिंग ११ ऑक्टोबर पासून अधिकृत वेबसाईटवर करता येणार आहे.