पिंक बॉल कसोटीत शतक झळकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली स्मृती मनधाना


क्विन्सलँड : पिंक बॉल कसोटीत शतक झळवण्याचा विक्रम भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मनधानाने विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटीच्या पहिल्या डावात भारताची स्थिती मजबूत आहे. ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाविरुद्ध सुरु असलेल्या एकमेव पिंक बॉल कसोटी सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली आहे. आतापर्यंत पहिल्या डावात भारताने एक विकेट गमावत 158 धावा केल्या आहेत.

स्मृतीच्या शतकाचा यात समावेश आहे. स्मृती मनधानाने सर्वोत्कृष्ट खेळी करत पहिल्या दिवसअखेर नाबाद 80 धावा पहिल्या दिवशी केल्या होत्या. कालचा खेळ पावसामुळे लवकर थांबवण्यात आला होता. पहिल्या दिवशी एक विकेटच्या मोबदल्यात 132 धावा केल्या होत्या. भारताची सलामीवीर शफाली 64 चेंडूत 31 धावा केल्या होत्या. भारताची सलामीवीर स्मृती मनधाना आणि शफाली वर्माने 93 धावांची दमदार सलामी दिली. शफाली बाद झाल्यानंतर आलेल्या पूनम राऊतसोबत स्मृतीने भारताच्या डावाला आकार देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत स्मृती नाबाद 102 आणि पूनम राऊत 19 धावांवर खेळत आहे.

दरम्यान महिला क्रिकेटच्या इतिहासात प्रकाशझोतात खेळवला जाणारा हा दुसराच कसोटी सामना आहे. तर पहिल्यांदाच भारतीय महिला संघ गुलाबी चेंडूवर खेळत आहे. याआधी 9 ते 12 नोव्हेंबर 2017 साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात पहिला डे-नाईट सामना खेळवण्यात आला होता. हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला होता.