या खास पदार्थांना ठिकाणांवरून मिळाली आहेत नावे

आपण काही पदार्थ अगदी आवडीने मनापासून खातो. प्रत्येक पदार्थाला काही ना काही नाव असतेच. हे नाव त्या पदार्थाला कसे मिळाले याची माहिती आपल्याला बरेचदा नसते. अनेकदा ही नावे काही विशिष्ट ठिकाणांच्या नावावरून दिली जातात. अश्याच काही पदार्थांची माहिती आमच्या वाचकांसाठी.

धारवाडी पेढा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. पेढा देशात सर्वत्र मिळतो पण धारवाड भागात हा खास पद्धतीने बनविला जातो म्हणून याला हे नाव मिळाले आहे. तीच गोष्ट बहुतेकांच्या रोजच्या खाण्यात असलेल्या पोह्यांची. पोहे सर्वत्र बनतात पण इंदोरी पोहा हा खास इंदोरची खासियत आहे.

काही विदेशी पदार्थात कॅलिफोर्निया रोल नावाने विकला जाणारा पदार्थ त्यातलाच. १९६० च्या दशकात लॉस एंजेलिसच्या बाहेरच्या भागात एका जपानी शेफला टूना फिश उपलब्ध झाला नाही तेव्हा त्याने चक्क खेकड्याचा वापर करून आणि रोल पॅकेजिंग मध्ये बदल केला. सी वीड ऐवजी त्यांने जपानी सुशीचा हा रोल बनविला आणि तो प्रचंड लोकप्रिय ठरला. हीच गोष्ट फ्रेंच टोस्टची. पूर्वी युरोप मध्ये शिळी पोळी किंवा ब्रेड उपयोगात आणण्याच्या प्रयत्नातून फ्रांस देशात हा पदार्थ बनला. शिल्लक राहिलेल्या ब्रेड मध्ये स्टफिंगचा वापर करून टोस्टेड डिश बनविली गेली ती शेतकऱ्यांकडून. पेन पर्ड्यू नावाने ती लोकप्रिय झाली आणि नंतर त्यालाच फ्रेंच टोस्ट म्हटले जाऊ लागले.

अमेरिकेच्या मिसिसिपी शहरावरून बनलेला मिसिसिपी मड पाय हा अतिशय स्वादिष्ट पदार्थ. चॉकलेट कुकी क्रस्ट पुडिंग, आईसिंग, मार्शमेलो आणि लिकरचा यात वापर केला जातो. स्वीडिश मीटबॉल मुळचे स्वीडनचे. खिमा, हर्ब्स, मसाले घालून केलेले हे छोटे छोटे मटणाचे गोळे युनिक मानले जातात. मॅश करताना त्यात बटाटे आणि लींगोनबेरी मिसळले जाते. स्कँडेनियन प्रवाश्यांनी हे स्वीडिश मीटबॉल्स २० व्या शतकात उत्तर अमेरिकेत आणले आणि आता हा तेथे लोकप्रिय पदार्थ आहे.

टर्किश डिलाईट स्वीट ट्रीट १७७७ मध्ये इंस्तंबूल मधील दुकानात बीट आणि मका पीठ यांचा वापर करून प्रथम बनविले गेले. जुन्या रेसिपी मध्ये गुळ, मध आणि मक्याचे पीठ विशिष्ठ प्रमाणात पाण्यात भिजवून त्यापासून हे बनविले जाते. मुळची तुर्कस्तानची ही मिठाई सुलतानाच्या महालात हलवाई म्हणून काम करणाऱ्या बेकीर एफेंडी याने बनविली होती असे इतिहास सांगतो.