तेजस ठाकरे आणि टीमने शोधली आंधळ्या ईलची प्रजाती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पर्यावरणात खुपच रस असलेले द्वितीय पुत्र तेजस ठाकरे आणि त्याचे सहकारी प्रवीण राजसिंह, अनिल महापात्रा आणि अन्नम पवनकुमार यांनी मुंबईला लागून असलेल्या पश्चिम घाट भागात भूमिगत गोड्या पाण्यातील ईल माशाची नवी प्रजाती शोधली आहे. तेजस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम वर या संदर्भात माहिती दिली असून त्यांचा हा शोध जर्नल ऑफ इच्चीतियोलॉजी मध्ये प्रसिद्ध झाले आहे. या जर्नल मध्ये मासे प्रजाती नवे शोध प्रसिद्ध केले जातात.

तेजस त्यांच्या पोस्ट मध्ये म्हणतात, काही वर्षापूर्वीच आम्ही ही प्रजाती शोधली होती. मात्र कोविड महामारी काळात तिच्यावर अधिक संशोधन करण्याची संधी मिळाली. पाणेरी सापाप्रमाणे दिसणारा हा ईल मासा आंधळा असतो. मुंबई जवळ तो सापडला त्यावरून त्याला मुंबा ब्लाइंड ईल नाव दिले गेले आहे. हे नाव मुंबईनगरीची देवी मुंबादेवी वरून दिले आहे.