गुरु नवज्योतसिंग सिद्धूची अशी आहे लाईफस्टाईल

राजकीय क्षेत्रात सध्या एक नाव सतत चर्चेत आहे. कॉंग्रेस नेता नवज्योतसिंग सिद्धू प्रथम पंजाब कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडले गेल्यावर चर्चेत आला होता आणि आता या पदाचा राजीनामा दिल्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. नवज्योत त्याच्या अलिशान राहणीमानामुळे सुद्धा चर्चेत असतो. क्रिकेट सोडल्यावर त्याने कॉमेडी शो मध्ये जजचे काम केले असून त्यानंतर तो राजकारणात सक्रीय आहे.

सिद्धूची बहुतेक कमाई कॉमेंट्री, टीव्ही शो, सोशल मिडिया, जाहिराती मधून होते. प्रत्येक सामन्याच्या कॉमेंट्रीसाठी तो वेगळी फी आकारतो. मिडिया रिपोर्ट नुसार आयपीएलच्या एका सिझन कॉमेंट्रीसाठी त्याने २२ कोटी घेतले होते. कपिल शर्मा शो मध्ये दर आठवड्याला त्याला ८ ते १० लाख रुपये मिळत असत.

सिद्धूला महागड्या घड्याळांची आवड असून त्याच्या संग्रही अनेक घड्याळे आहेत. त्यातील एक खास घड्याळ ४४ लाख रुपयांचे आहे. त्याला अलिशान कार्सचा शौक असून त्याच्या संग्रही लँडक्रुझर सह मिनी कुपर, फॉर्च्यूनर, बीएमडब्ल्यू ६, टोयोटा करोला अश्या २६ ते १ कोटी रुपये किमतीच्या गाड्या आहेत शिवाय एक अँबेसीडोर कार सुद्धा आहे. त्याचा अमृतसरच्या पॉश भागात एकाद्या महालासारखा अलिशान बंगला असून तेथे सर्व सुखसुविधा आहेत. या घराची किंमत ३१ कोटी असून अन्यत्र सुद्धा त्याच्या मालमत्ता आहेत.

निवडणुकीच्या वेळी भरलेल्या अर्जानुसार सिद्धूकडे ६.९३ कोटींची चल तर ४५.७१ कोटींची अचल संपत्ती आहे.