देशात काल दिवसभरात 23 हजार 529 कोरोनाबाधितांची नोंद, तर 311 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांची संख्या सलग दोन दिवस 20 हजारांच्या आत आलेली असतानाच काल दिवसभरात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात 23 हजार 529 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 311 जणांना आपला जीव गमवावा लागलला आहे. तर काल दिवसभरात 24 तासात एकूण 28 हजार 718 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

दरम्यान देशातील एकूण बाधितांच्या संख्येपैकी एकट्या केरळमध्ये अर्ध्याहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. केरळमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली असून काल दिवसभरात 12 हजार 161 बाधितांची नोंद झाली आहे. तर 155 जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये काल 17 हजार 862 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

तसेच महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत घट पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात काल दिवसभरात 3,187 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 49 जणांचा मृत्यू झाला. तर काल राज्यात 3 हजार 253 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 63 लाख 68 हजार 530 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.26 टक्के आहे.