आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र वक्तव्यांमुळे बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. राखीने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो अपलोड केले आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. यात ती फार ग्लॅमरस दिसत असली तरी नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
ग्लॅमरस फोटो शेअर केल्यामुळे पुन्हा ट्रोल झाली राखी सावंत
सोशल मीडियावर राखी ही नेहमी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. ती यात तिच्या काही फिरंगी मित्रांसह आणि हॉलिवूड स्टार्स सोबत दिसत आहे. यात राखीने तिच्या मित्रांप्रमाणेच हटके लूक केला आहे. तिची स्टाईल आणि लूक अगदी तिच्या मित्रांप्रमाणेच पाहायला मिळत आहे.
राखीने पोस्ट केलेले हे फोटो कोणत्या कार्यक्रमातील आहे, याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण तिने यातील प्रत्येक फोटोत हॉलिवूडप्रमाणे पोज देण्याचा प्रयत्न केला आहे. माझे काही फिरंगी मित्र आणि हॉलिवूड स्टार्स, असे कॅप्शन या फोटोंना राखीने दिले आहे. पण नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंवरुन तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
एका नेटकऱ्याने यावेळी म्हटले, त्यांच्यासमोर तू लहान बाळ वाटतेस. तर एकाने हीच आपली संस्कृती आहे का? असा प्रश्न थेट राखीला विचारला आहे. राखीने याआधीही काही बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो अपलोड केले होते. त्यावरही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते.