जाणून घ्या शिवलीला यांनी बिग बॉसच्या घराबाहेर पडण्यामागचे कारण …


‘बिग बॉस’ छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तेवढाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. बिग बॉस मराठी सिझन ३ १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जवळपास दोन वर्षांनंतर बिग बॉस मराठी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कलाकरांसोबतच किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील या शोमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. पण आता शिवलीला यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले आहे. पण बिग बॉसच्या घरातून त्या बाहेर का पडल्या? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला होता.

बिग बॉस हा कार्यक्रम आणि अनिश्चितता याचे खूप जवळच नाते आहे. कधी काय या खेळात घडेल ? हे कोणीच सांगू शकत नाही. तृप्ती देसाई आणि शिवलीला बाळासाहेब पाटील ही दोन नावे बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये गाजली. अत्यंत वेगळ्या क्षेत्रातून आलेल्या या दोन्ही महिलांनी पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

शिवलीला यांनी नुकतेच कार्यक्रमामध्ये सांगितले, येथील प्रत्येक माणूस माझा असेल. त्यांच्या या वाक्याने सदस्यांबरोबरचं प्रेक्षकांची मने देखील जिंकली. पण, शिवलीला यांची प्रकृती अचानक ढासळल्यामुळे बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ त्यांना बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावे लागल्यामुळे व्होटिंग लाईन्स आजपासून बंद राहणार आहेत.