४२ हजाराच्यावर खड्डे एप्रिलपासून आजपर्यंत भरले – मुंबई महापौर


मुंबई – मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे पाऊस आला की दिसू लागतात. लांबच लांब वाहतूक कोंडी या खड्ड्यांमुळे होत असून अपघातही घडत आहेत. नागरिकांनी देखील मुंबईतील खड्ड्यांबाबत संताप व्यक्त केला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेतली. मुंबईतील रस्त्यांबाबत कामचुकार कंत्राटदारांवर कारवाई तसेच आयुक्तांना दर आठवड्याला आढावा घेण्याचे आदेश दिल्याचे महापौरांनी सांगितले.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ४२ हजाराच्यावर आपण खड्डे एप्रिलपासून आजपर्यंत भरले आहेत. दरम्यान, भरलेले खड्डे पुन्हा उखरले की नवीन खड्डे निर्माण झाले ही पाहणी दोन दिवसांपुर्वी केली. तसेच खड्डे भरताना अधिकाऱ्यांनी, कंत्राटदारांवर कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवले पाहीजे. हे करत असतांना वाहतूकीला अडथळा होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे.

मुंबई आणि त्याच्या आसपासच्या रस्त्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी होत आहे. कोंडी होण्याचे सर्वात मोठे कारण खड्ड्यांना सांगितले जात आहे. मुंबईकर खड्ड्यांमुळे खूप चिंतेत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेते खड्डे भरण्याचे काम झाले पाहिजे, असे किशोरी पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.