मुंबई उपनगर येथील जिल्हास्तरीय क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन


मुंबई : आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतीभावंत खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्यावत क्रिडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटित प्रयत्न करणे, क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. याकरीता क्रीडा व युवक सेवा संचालनालय व आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने बॉईज स्पोर्टस कंपनी पुणे येथील प्रवेशाकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर कार्यालयातर्फे जिल्हास्तरीय क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय चाचणी 5 ऑक्टोबर रोजी डायव्हिंग, वय 8 ते 12 वर्ष आतील (फक्त मुले) (दि.01.01.2022 रोजी वय 8 ते 12 असणे आवश्यक राहील); ॲथलेटिक्स-वय 10 ते 14 वर्ष आतील (फक्त मुले) (01.01.2022 रोजी वय 10 ते 14 असणे आवश्यक राहील) ; बॉक्सिंग- वय 10 ते 14 वर्ष आतील (फक्त मुले) (01.01.2022 रोजी वय 10 ते 14 असणे आवश्यक राहील) ; कुस्ती- वय 10 ते 14 वर्ष आतील (फक्त मुले) (01.01.2022 रोजी वय 10 ते 14 असणे आवश्यक राहील) ; तलवारबाजी- वय 10 ते 14 वर्ष आतील (फक्त मुले) (01.01.2022 रोजी वय 10 ते 14 असणे आवश्यक राहील) ; वेटलिफ्टिंग- वय 10 ते 14 वर्ष आतील (फक्त मुले) (01.01.2022 रोजी वय 10 ते 14 असणे आवश्यक राहील) या सर्व चाचण्या- भारतीय खेळ प्राधिकरण, आकुर्ली रोड, कांदिवली येथे होणार असून सर्व चाचण्यांची वेळ सकाळी 8.00 वा. असणार आहे.

शाळा/क्लब/खाजगी क्रीडा संस्थामधील सराव करत असणाऱ्या उद्‌योन्मुख खेळाडूंना या खेळनिहाय क्रीडा नैपुण्य चाचण्यांमध्ये सहभाग घेता घेईल. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता योग्य त्या खबरदारीसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंची नावे, शाळेचे/क्रीडा संस्थेचे नाव, घरचा पत्ता, जन्म तारीख, इयत्ता आणि संपर्क क्रमांक आदी संपूर्ण माहिती आधारकार्ड प्रतीसह जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर या कार्यालयास [email protected] या मेल आयडीवर 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मेल करण्यात यावा, असे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.