नवी दिल्ली – कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत गेल्या काही दिवसांपासून हळूहळू घट होत असल्याचे चित्र दिसत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या 20 हजारांच्या आत आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 18 हजार 870 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 378 रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर काल दिवसभरात 28 हजार 178 बाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. दरम्यान मागील 24 तासात एकट्या केरळमध्ये 11 हजार 196 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 149 जणांना आपला जीव गमवावा लागला.
काल दिवसभरात देशात 18 हजार 870 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 378 रुग्णांचा मृत्यू
दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात काल दिवसभरात 2844 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 60 रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर काल दिवसभरात 3 हजार 029 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 65 हजार 277 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.26 टक्के आहे.
तसेच गेल्या 24 तासात मुंबईत 394 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 477 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत मुंबईत 7,18,813 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर गेल्या 24 तासात मुंबईत सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4611 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1200 दिवसांवर गेला आहे.