कन्हैया कुमारच्या काँग्रेस प्रवेशावरुन भाजप नेत्याची बोचरी टीका


नवी दिल्ली – मंगळवारी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमारने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनीही काँग्रेस परिवारात दाखल झाल्याचे सांगितले. काँग्रेससोबत आपली नवीन राजकीय खेळी कन्हैया कुमारने सुरू केली आहे. कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर अनेक प्रक्रिया येत आहेत.

राहुल गांधींनी कन्हैया कुमार यांना पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले. तरुण नेता म्हणून डाव्यांच्या राजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या कन्हैया कुमारने फारच कमी वेळात डाव्यांच्या बड्या नेत्यांच्या उंचीच्या बरोबरीने आपले स्थान निर्माण केले. कन्हैया कुमारने सीपीआय सोडल्यानंतर पक्षाचे सरचिटणीस डी राजा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

कन्हैया कुमारने स्वतःला माझ्या पक्षातून बाहेर काढले. जातिहीन, वर्गहीन समाजासाठी सीपीआय लढत आहे. त्यांच्या काही वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि ध्येये नक्कीच असतील. कम्युनिस्ट आणि कामगार वर्गाच्या विचारसरणीवर त्याचा विश्वास नसल्याचे यावरून दिसून येते, असे डी. राजा यांनी म्हटले आहे. डी. राजांनी कन्हैयाला काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चेबाबत बोलण्यासाठी पक्षाच्या मुख्यालयात माध्यमांशी बोलण्यास सांगितले होते.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनीही कन्हैया कुमार यांच्या पक्ष प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. जर कोणी गटारातून बाहेर पडून नाल्यात पडला तर मी फक्त त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करू शकतो, अशी प्रतिक्रिया कैलास विजयवर्गीय यांनी दिली आहे.