आइसलँड संसदेत महिला राज

महिलांची संख्या अधिक असलेली युरोपातील पहिली संसद आईसलंड मध्ये बनली असून ६३ सांसद किंवा खासदार असलेल्या या संसदेत ३३ महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. शनिवारी लागलेला या निवडणुकीचा निकाल म्हणजे उत्तर अटलांटिकच्या द्विपीय राष्ट्रात लैंगिक समानतेचा मैलाचा दगड मनाला जात आहे. या निमित्ताने आइसलँड या देशाने जगासमोर अनोखा आदर्श निर्माण केल्याचे मानले जात आहे.

पंतप्रधान कॅटरिन जेकब्सदातीर यांच्या नेतृत्वाखालील गठबंधन सरकारच्या तीन दलांनी ३७ जागा जिंकल्या असून या आघाडीने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दोन जागा जास्त मिळविल्या आहेत. हीच आघाडी त्यामुळे यंदाही सत्तेत राहणार असे संकेत मिळाले आहेत. राज्यशास्त्र विषयाच्या प्रोफेसर सिल्जा बारा ओमर्सदातीर म्हणाल्या गेल्या दशकात वाम्पान्ठी दलांनी लागू केलेल्या लैगिक कोटा मुले आइसलँड राजकारणात नवीन मापदंड स्थापन केला असे म्हणता येईल. त्यामुळे निवडणूक उमेदवार ठरविताना आता लैंगिक समानतेची उपेक्षा करणे अवघड होणार आहे. जनमत सर्व्हेक्षणात वाम पंथी दलाच्या विजयाचे संकेत मिळाले होते.

निकालात मध्य दक्षिणपंथी इंडिपेंडन्स पार्टीला सर्वाधिक १६ जागा मिळाल्या असून त्यात सात महिला आहेत.

जपान मध्ये सुद्धा आगामी पंतप्रधान निवडणुकीसाठी असलेल्या चार उमेदवारात दोन महिला उमदेवार असून त्याची नावे सामे ताकाइची आणि सेको नोडा अशी आहेत. पंतप्रधान पदावर दावेदारी सांगणाऱ्या जपान मधील त्या पहिल्याच महिला आहेत मात्र त्यांना हे पद मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.