हिऱ्यांपेक्षाही मौल्यवान आणि दुर्मिळ लाकूड

जगात बहुमुल्य वस्तू कोणत्या असे विचारले गेले तर चटकन हिरे, सोने यांचेच नाव सांगितले जाते. पण प्रत्यक्षात एक लाकूड हिऱ्यांपेक्षा सुद्धा अतिशय मौल्यवान आणि दुर्मिळ आहे. त्याला ‘वूड ऑफ गॉड’ म्हणजे परमेश्वराचे लाकूड किंवा रेअर वूड म्हटले जाते. अकीलारीया झाडापासून हे लाकूड मिळते. त्याला अगरवूड असे नाव आहे. पण इगलवूड, एलोस वूड या नावानेही ते ओळखले जाते.

चीन, जपान, भारत, अरब आणि दक्षिणपूर्व आशियातील अनेक देशात हे लाकूड मिळते मात्र दुर्मिळ असल्याने ते प्रचंड महाग आहे. या लाकडाच्या १ ग्रामसाठी भारतात सव्वा तीन लाख रुपये मोजले जातात तर अन्य देशात १ ग्रामची किंमत १० हजार डॉलर्स म्हणजे ७ लाखापर्यंत जाते. जपान मध्ये हे लाकूड क्याना किंवा क्यारा नावाने ओळखले जाते. या लाकडापासून उच्च प्रतीचे अत्तर आणि परफ्युम बनविली जातात. या लाकडातून तेल निघते. हे तेल सेंट बनविताना वापरले जाते. आज या तेलाची एक किलोची किंमत २५ लाख रुपये आहे.

हॉंगकॉंग, चीन, जपान मध्ये आकालारीयाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत मात्र अगरवूड मिळविण्यासाठी त्याची मोठ्या प्रमाणावर तोड आणि तस्करी होते. बीबीसी रिपोर्ट नुसार ही झाडे नामशेष होण्याची भीती अति तोडीमुळे निर्माण झाली आहे. एशियन प्लांटेशन कॅपिटल कंपनी या झाडांचे प्लांटेशन करणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी असून ही झाडे वाचाविण्यासाठी सुद्धा ती काम करते.