कर्जबाजार पणाला कंटाळून जगातील या 5 अरबपतींनी केली आहे आत्महत्या


आपल्याकडे पैसा आल्यानंतर आपले अनेक सर्व प्रश्न सुटतील असे आपल्यापैकी अनेक लोकांना वाटते. पण पैसा हेच उत्तर प्रत्येक प्रश्नावर नसल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. मोठा व्यवसाय, मोठे व्यवहार हे आपल्यासोबत मोठा ताणतणाव देखील घेऊन येतात. कॅफे कॉफी डे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ अचानक बेपत्ता झाले आणि त्यांचा आज मृतदेह नेत्रावती नदीमध्ये सापडला असून त्यामागे कर्जबाजारीपणा आणि व्यवसायातील नुकसान हेच कारण मानले जात आहे. आपल्या चिट्ठीत या कारणांचा स्पष्ट उल्लेख त्यांनी केला होता

असे करणारे व्ही. जी. सिद्धार्थ हे एकमेव उद्योगपती नसून ज्यांनी या कारणास्तव टोकाचा निर्णय घेतला. जगात असे 5 उद्योगपती आहेत ज्यांच्याकडे संपत्तीची कमतरता नव्हती. त्यानंतरही त्यांनी आत्महत्या करत जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. पैशाने प्रश्न सुटतात असे मत असणाऱ्यांना त्यांच्या या निर्णयामुळे मोठा संदेश दिला आहे. तसेच आत्महत्येबाबत विचार करण्यास इतरांना भाग पाडले आहे.

‘प्रॉपर्टी टायकून’ म्हणून लंडनचे पॉल कॅस प्रसिद्ध होते. त्यांची श्रीमंती सांगण्यासाठी प्रायव्हेट जेट, फरारी आणि बेंटले कार, स्विझर्लंड, फ्रान्स, ब्रिटनमध्ये संपत्ती या सर्व गोष्टी पुरेशा आहेत. 2010 मध्ये लंडनच्या अंडरग्राऊंड ट्रेनसमोर उडी घेऊन 54 वर्षांच्या पॉल यांनी आत्महत्या केली. पोलो खेळण्याचीही पॉल यांना आवड होती. अगदी ब्रिटनचे प्रिंस चार्ल्स यांच्यासोबतही त्यांचे फोटो आहेत. दोघे त्यात पोलो खेळत असताना चर्चा करताना पाहायला मिळतात.

आपल्या व्यवसायात पॉल यांच्या शेवटच्या काळात त्यांना बरच नुकसान झाले. त्यांच्या अनेक प्रॉपर्टी डील या काळात अयशस्वी ठरल्या होत्या. गॅस आणि ऑईल सर्व्हे कंपनीमध्ये त्यांनी मोठी गुंतवणूक केली होती. पण ही सर्व गुंतवणूक बुडाली. बरेच प्रश्न पॉल यांच्या व्यक्तिगत आयुष्यातही तयार झाले होते. तीनवेळा त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर ते चौथे लग्न करणार होते. या व्यतिरिक्त ह्रदयाशी संबंधित आजार आणि ट्युमर यांनी देखील त्यांचे आरोग्य बिघडले होते. पॉल यांनी अखेर याला कंटाळून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत ट्रेनसमोर उडी घेऊन आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

सप्टेंबर 2011 मध्ये आपल्या छातीवर गोळ्या झाडत फाल्कनस्टर या डाटा स्टोअरेज कंपनीचे प्रमुख रेजेन हुएई यांनी आपले आयुष्य संपवले. त्यांनी हा निर्णय घेण्याआधी एका प्रकरणात त्यांच्यविरोधात गुन्हा दाखल झाल्याने कंपनी सोडली होती. अशाप्रकारे कंपनीतून बाहेर व्हावे लागल्याने त्यांना मोठा धक्का बसला होता. 17 कोटी रुपयांच्या घराच्या लॉनमध्ये बसलेले असताना त्यांनी आत्महत्या केली. तायवानमध्ये त्यांचा जन्म झाला होता, तर अमेरिकेत त्यांचे शिक्षण झाले.

डिसेंबर 2009 मध्ये स्वतःवर गोळी झाडत ब्रिटेनचे अरबपती जोनाथन रॅथ यांनी 35 व्या वर्षी आत्महत्या केली. पण हा टोकाचा निर्णय त्यांनी का घेतला हे सांगणारी कोणतीही सुसाईड नोट भेटलेली नाही. त्यांनी त्याच्या दोन वर्षांपूर्वी आपल्या वडिलांचा व्यवसाय 3 अरब 16 कोटी रुपयांना विकला होता. ते त्यानंतर शुटिंगचे काम करत होते. ते आत्महत्येचा विचार करत असल्याची शंकाही त्यांच्या जवळच्या कुणाही व्यक्तीला आली नाही. ते प्रत्येकाच्या नजरेत एक श्रीमंत व्यक्ती होते आणि आपला व्यवसाय विकून शुटिंगचा छंद पूर्ण करत असल्याचे वाटत होते. पण वडिलांच्या मृत्यूचा धक्का त्यांना सहन न झाल्याने त्यांनी असा टोकाचा निर्णय घेतल्याचे नंतर सांगितले गेले.

पोलंडमध्ये एली एम. ब्लॅक यांचा जन्म झाला. पण त्यांनी एक यशस्वी उद्योजक म्हणून अमेरिकेत ओळख तयार केली. त्यांची युनायटेड ब्राँड्स ही कंपनी फळांचे उत्पादन आणि निर्यातीचे काम करायची. फेब्रवारी 1975 मध्ये त्यांनी 53 व्या वर्षी न्युयॉर्कमधील उंच इमारतीवरुन उडी घेऊन आपले जीवन संपवले. त्यांनी आत्महत्या करण्याआधी आपल्या सुटकेसने खिडकीची काच फोडली होती. दुधाच्या बॉटलची कॅप तयार करण्यापासून ब्लॅक यांनी आपल्या कामाची सुरुवात केली होती. ते त्यानंतर हळुहळु अमेरिकेचे मोठे व्यापारी म्हणून उदयास आले.

होंडुरासमधील त्यांच्या कंपनीच्या केळी बागा 1974 मध्ये फिफी वादळाने उद्ध्वस्त झाल्या. त्यांच्या कंपनीला यावर्षी पहिल्या तिमाहित पाऊणेतीन अरब रुपयांचा तोटा झाला. ब्लॅक यांच्या मृत्यूनंतर काही आठवड्यातच एक गौप्यस्फोट झाला. त्यानुसार त्यांची कंपनी होंडुरासने तत्कालीन राष्ट्रपतींना केळीच्या निर्यातीवरील कर कमी करण्यासाठी लाच दिली होती.

वयाच्या 49 व्या वर्षी ब्रिटनमधून हूबर्ट बुमीस्टर हे बेपत्ता झाले होते. आपल्या परवानाधारक बंदूकीसह ते घराबाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह आठवडाभरातच ब्रिटेनमधील बर्कशायरमध्ये सापडला. गोळ्यांचे निशाण त्यांच्या मृतदेहावर पाहायला मिळाले होते. जून 2009 मध्ये ही घटना घडली. एबीएन एमरो या कंपनीच्या संचालक मंडळाचे बुमीस्टर सदस्य होते. 3 कोटी 70 लाख रुपये एवढे बुमीस्टर यांचे वेतन होते. रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडने या कंपनीला टेकओव्हर केले होते. त्यांची नोकरी मृत्यूपूर्वी 3 महिनेआधी गेली होती. त्यांनी त्यामुळेच आत्महत्या केल्याचे सांगितले गेले.

Leave a Comment