या अनोख्या शर्यतीत केवळ महिलाच होऊ शकतात सहभागी


तुम्ही कधी अशा शर्यतीबद्दल ऐकले आहे का ? ज्यामध्ये केवळ महिलाच सहभागी होऊ शकतात. कदाचित नाही. ब्रिटनमध्ये दरवर्षी अशीच एक घोड्यांची शर्यत होते, ज्यामध्ये केवळ महिला सहभागी होतात. यामध्ये टिव्ही एंकरपासून ते मॉडेल, फॅशन डिजाईनर, विद्यार्थींनी सहभागी होत असतात.

या अनोख्या शर्यतीला ‘मॅग्नोलिया कप हॉर्स रेस’ नावाने ओळखले जाते. या स्पर्धेची सुरूवात 2012 ला झाली असून,  यंदा या शर्यतीचे सातवे वर्ष आहे. या शर्यतीमुळे ब्रिटनमध्ये 1 ऑगस्टला ‘लेडीज डे’ म्हणून देखील ओळखले जाते.

ही अनोखी शर्यत 11 महिलांमध्ये होत असते. या स्पर्धेद्वारे जमा होणारी रक्कम जगभरातील महिलांच्या हितासाठी वापरली जाते. अंदाज आहे की, यंदा या शर्यतीद्वारे 20 करोड रूपये जमा होऊ शकतात.

यंदा ही शर्यत बघण्यासाठी जवळपास 30 हजार लोक उपस्थित राहू शकतात. 2012 मध्ये पहिल्यांदाच झालेल्या या शर्यती वेळी 10 हजार लोक उपस्थित होते.

या शर्यतीचे वैशिष्ट म्हणजे यामध्ये सहभागी होणाऱ्या महिला या व्यावसायिक घोडेस्वार नसतात. सर्वजणी केवळ आवड म्हणून यात भाग घेतात. त्यामुळेच या महिलांना दोन महिने आधीच शर्यतीच्या ठिकाणी बोलवून प्रशिक्षण दिले जाते.

यंदा ब्रिटनचे प्रतिष्ठित विक्टोरिया रेसिंग क्लबची सदस्या जॉर्जिया कोनोलीला शर्यतीची अ‍ॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे. याशिवाय शर्यतीमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये खादिजा मल्ला (इंजिनिअरिंगची विद्यार्थींनी), लुइसा जिसमेन (टिव्ही स्टार), एलेक्सिस ग्रीन (बीबीसी रिपोर्टर), केट ग्रोवर (एमडब्ल्यू अॅन्ड एल कॅपिटल पार्टनर्स लिमिटेडमध्ये कार्यकारी सहायक),  रैसेल गॉलेंड (मार्केटिंग कम्यूनिकेशन मॅनेजर), वालेरिया होलिंगर ( मार्केटिंग असिस्टेंट), किटी ट्राइस ( द रेसिंग पोस्टमध्ये पत्रकार), सोफी वान डर वर्म ( गृहिणी), रोसी टॅपनर (ऑक्सफर्ड-ब्रुक्स विद्यापीठात विद्यार्थींनी) आणि वॉग विलियम्स (मॉडल) यांचा समावेश आहे.

यंदा शर्यतीमध्ये खादिजा मल्ला हिजाब परिधानकरून ट्रॅकवर उतरेल. या शर्यतीच्या इतिहासात ही पहिलीच अशी घटना आहे. 18 वर्षीय खादिजा लंडन साउथ बँक युनिवर्सिटीमध्ये इंजिनिअरिंग करत आहे.

Leave a Comment