काल दिवसभरात देशात 29,616 कोरोनाबाधितांची नोंद, तर 290 जणांचा मृत्यु


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत जरी चढ-उतार दिसत असला तरी सक्रिय बाधितांचा आलेख हळूहळू मंदावताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार काल दिवसभरात देशात 29,616 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली, तर 290 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर काल दिवसभरात 28,046 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी एकट्या केरळमध्ये 17,983 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 127 लोकांचा मृत्यू झाला. तर देशात आतापर्यंत कोरोनाचे 84.89 कोटी एवढ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले आले आहे.

काल दिवसभरात राज्यात 3,286 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 हजार 933 बाधित कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 57 हजार 012 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.23 टक्के आहे. राज्यात काल 51 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

तसेच काल मुंबईत 446 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 430 बरे रुग्ण झालेले आहेत. शहरात आतापर्यंत 716941 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 97% आहे. सध्या शहरात एकूण सक्रिय रुग्ण 4809 इतर आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर 1187 दिवसांवर गेला आहे.