अॅपलच्या आयफोन १४ सिरीज मध्ये नसणार मिनी

अॅपल आयफोन सिरीज १३ नुकतीच लाँच झाली असून आता आयफोन १४ सिरीजची चर्चा सुरु झाली आहे. आयफोन १४ सिरीज तीन व्हेरीयंट मध्ये येणार असल्यचे संकेत मिळत असून या सिरीज मध्ये आयफोन १४ मिनी असणार नाही असे सांगितले जात आहे. अर्थात कंपनीने त्या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. अॅपलने आयफोन १२ सिरीज मध्ये प्रथम मिनी व्हेरीयंट सादर केले होते आणि आयफोन १३ मध्येही हे व्हेरीयंट आहे.

रिपोर्ट नुसार मिनी मुळे अॅपलला फारसा फायदा झालेला नाही. मिनीला ग्राहकांकडून फारसा प्रतीसाद मिळालेला नाही. टिप्स्टर जॉन प्रोस्टरने आयफोन १४ सिरीज मध्ये मिनी येणार नाही असा दावा केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार २०२२ आयफोन १४ चार ऐवजी तीन मॉडेल मध्ये सादर होईल.

भारतीय बाजारात आयफोन १३ मिनीच्या १२८ जीबी व्हेरीयंटची किंमत ६९९९० रुपये आहे. तर २५६ जीबीसाठी ७९९९० आणि ५१२ जीबी साठी ९९९९० किंमत आहे. आयफोन १२ सिरीजची बेस प्राईज ६४ जीबी साठी ६९९९० होती. याचाच अर्थ आयफोन १२ च्या तुलनेत आयफोन १३ सिरीज स्वस्त विकली जात आहे.