Walton कुटुंबिय ठरले जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब; पहिल्या दहामध्ये अंबानी कुटुंबियांचा समावेश


नवी दिल्ली – शेअर बाजारातील सततची तेजी आणि अनुकूल कर धोरण अशा अनेक कारणांमुळे जगातील श्रीमंत अजूनच श्रीमंत होत आहे, तर गरिबांची गरिबी वाढत आहे. म्हणूनच या वर्षी 22 टक्यांची वाढ जगातील 25 श्रीमंत कुटुंबियांच्या संपत्तीत झाली आहे. 1.7 ट्रिलियन डॉलर एवढी या 25 कुटुंबांची एकूण संपत्ती झाली आहे. हा दावा ब्लूमबर्गच्या अहवालात करण्यात आला आहे. अहवालानुसार, या घराणेशाहीच्या संपत्तीत गेल्या एका वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे. तर, जर या 25 कुटुंबांच्या मालमत्ता एकत्र केल्या तर त्या पैशाने फक्त एकच नाही तर अनेक देश विकत घेता येतील.

The Walton कुटुंबिय या 25 श्रीमंत कुटुंबांमध्ये पहिल्या स्थानावर आहेत. या यादीत चार वर्षांपासून हे कुटुंब पहिल्या स्थानावर आहे आणि त्यांची संपत्ती 238.2 अब्ज डॉलर्स एवढी आहे. त्यांच्या संपत्तीत गेल्या 12 महिन्यांत 23 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

Mars कुटुंब दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यांची संपत्ती 141.9 अब्ज डॉलर आहे. तिसऱ्या स्थानावर Koch कुटुंब असून, त्यांची संपत्ती 124.4 अब्ज डॉलर एवढी आहे. Hermes कुटुंबिय चौथ्या क्रमांकावर आहेत, ज्यांची संपत्ती 111.6 अब्ज डॉलर्स एवढी आहे. पाचव्या स्थानावर Al Saud कुटुंब असून त्यांची संपती 100,000 मिलिअन डॉलर्स एवढी आहे. त्याचबरोबर भारतामधील अंबानी कुटुंब सहाव्या स्थानावर आहे आणि त्यांची संपत्ती 93.7 अब्ज डॉलर्स एवढी आहे.

Wertheimer कुटुंब सातव्या स्थानावर असून त्यांची संपती, 61.8 अबंज डॉलर्स आहे. आठव्या क्रमांकावर Johnson 61.2 अब्ज डॉलर्ससह कुटुंब आहे. नवव्या स्थानावर Thomson कुटुंब असून, त्यांची संपती 61.1 अब्ज डॉलर्स एवढी आहे आणि दहाव्या स्थानावर Boehringer कुटुंब असून, त्यांची संपती 59.2 अब्ज डॉलर्स एवढी आहे.

जर आपण या 25 कुटुंबांच्या मालमत्तेची तुलना केली तर असे फक्त 9 देश आहेत ज्यांचा जीडीपी या कुटुंबांच्या एकत्रित संपत्तीपेक्षा जास्त आहे. या देशांमध्ये अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, भारत, यूके, फ्रान्स, ब्राझील, इटली यांचा समावेश आहे. याखेरीज सर्व देश त्यांच्यापेक्षा खूप मागे आहेत. याशिवाय, ही 25 कुटुंबे मिळून कॅनडा, रशिया, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, स्पेन, मेक्सिको, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका अशा अनेक देशांना ताब्यात घेऊ शकतात.