सार्क देशांच्या बैठकीत तालिबानचा समावेश करण्यासाठी पाकिस्तान आग्रही


इस्लामाबाद – सार्क परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पाकिस्तानच्या तालिबानवरील प्रेमामुळे अखेर रद्द करण्यात आली आहे. अफगाणिस्तानवर ताबा मिळवणाऱ्या तालिबानचाही या बैठकीत समावेश व्हावा असा आग्रह सार्कच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वीच पाकिस्तानने धरला होता. कोरोनामुळे ही बैठक २०२० मध्ये व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आता ही बैठक प्रत्यक्ष नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार होती. पण पाकिस्तानच्या मागणीमुळे ही बैठकच रद्द करण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या या प्रस्तावावर भारताने इतर काही सदस्यांसह आक्षेप घेतला आणि एकमत किंवा सहमती नसल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली. यावेळी नेपाळकडे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्याची जवाबदारी होती. परिषदेच्या दक्षिण आशियाई संघटनेच्या मंत्र्यांची बैठक यावेळी २५ सप्टेंबर रोजी होणार होती. पण ही बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक रद्द झाल्यानंतर नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सर्व सदस्यांमध्ये एकमत नसल्यामुळे बैठक रद्द करण्यात आल्याचे एका निवेदनाद्वारे म्हटले आहे.

भारताकडून आतापर्यंत तालिबानला मान्यता मिळालेली नाही. संपूर्ण जगाने देखील काबूलमधील नवीन राजवटीला अद्याप मान्यता दिलेली नाही, तसेच संयुक्त कॅबिनेट मंत्र्यांना संयुक्त राष्ट्र संघाने काळ्या यादीत टाकले आहे. अमीर खान मुत्तकी हे अफगाणिस्तानमधील तालिबान नेतृत्वाखालील सरकारचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री आहेत आणि ते संयुक्त राष्ट्र आणि संबंधित संमेलनांना उपस्थित राहण्याची शक्यता नाही.

संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६व्या अधिवेशनाच्या वेळी २५ सप्टेंबर रोजी साउथ एशियन असोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन (सार्क) मंत्रिमंडळाची अनौपचारिक बैठक न्यूयॉर्कमध्ये वैयक्तिकरित्या होणार होती. त्यानंतर आता सार्क देशांची बैठक रद्द करण्याबाबत अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. या वर्षीच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानातील दहशतवादी कारवायांसह, अफगाणिस्तानातील परिस्थितीवरही बैठकीत चर्चा करणार होते.

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) च्या गेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तालिबान हे एक सर्वसमावेशक सरकार आहे, अफगाणिस्तानमधील राजवट स्वीकारण्यापूर्वी किंवा मान्यता देण्यापूर्वी जगाने विचार केला पाहिजे, असे म्हटले होते. काबूलमध्ये महिला, अल्पसंख्यांकांना सरकारमध्ये प्रतिनिधित्व नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते.