दुबई – आयपीएलमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला असून सनरायजर्स हैदराबादचा जलदगती गोलंदाज टी नटराजनला कोरोनाची लागण झाली आहे. टी नटराजनची आरटीपीसीआर चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आयपीएलने दिली आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे टी नटराजनला जाणवत नसून सध्या इतर सहकाऱ्यांपासून अंतर ठेवत विलगीकरणात आहे. आज दिल्ली कॅपिटल्ससोबत सनरायजर्स हैदराबादचा सामना होणार आहे. कोरोनामुळे आयपीएलचा हंगाम स्थगित केल्यानंतर पुन्हा एकदा त्याचा उर्वरित भाह दुबईत खेळले जात असून हैदराबादचा आज हा पहिलाचा सामना आहे.
आयपीएलमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव; टी नटराजनला कोरोनाबाधित
दरम्यान टी नटराजनसोबत हैदराबादचा आणखी एक खेळाडू विजय शंकर आणि पाच सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. हे सर्वजण टी-नटराजनच्या संपर्कात आले होते अशी माहिती देण्यात आली आहे. आयपीएलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजता जवळच्या संपर्कातील आणि इतरांची आरटीपीसीआर टेस्ट केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामुळे आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये होणारा सामना ठरल्याप्रमाणे पार पडेल.
टी-नटराजनच्या संपर्कात आलेले ते सहाजण ज्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, त्यामध्ये विजय शंकर, टीम मॅनेजर विडय कुमार, फिजिओथेरपिस्ट श्याम सुंदर जे, डॉक्टर अंजना वन्नन, लॉजिस्टिक मॅनेजर तुषार खेडकर, नेट गोलंदाज पेरियासॅमी गणेशन यांचा समावेश आहे.