भारतातील या आणखी दोन समुद्रकिनाऱ्याना ब्ल्यू फ्लॅग

जगातील खास मान्यताप्राप्त स्वैच्छिक इको लेबल अॅवॉर्ड ब्ल्यू फ्लॅग यादीत यंदा भारतातील आणखी दोन समुद्रकिनारे समाविष्ट झाले आहेत. तामिळनाडू मधील कोवालम आणि पुडुचेरीच्या इडन समुद्रकिनाऱ्यांना या यादीत स्थान मिळाले आहे. समुद्र किनारे, मरीना बीच, सस्टेनेबल बोटिंग टुरिझम ऑपरेटर्सना हा खिताब दिला जातो. फौंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन संस्था ही स्वयंसेवी संस्था हे खिताब देते आणि जगातील ६० देश तिचे सदस्य आहेत.

भारतात असा ब्ल्यू फ्लॅग मिळविलेले आणखी आठ किनारे असून त्यात या दोन किनाऱ्यांची भर पडली आहे. गुजराथचा शिवराजपूर, दिव चा घोघला, कर्नाटकचा कासरकोड आणि पदुबीद्री, केरळचा कप्पड, आंध्र मधील रुशिकोंडा, ओरिसाचा गोल्डन, अंदमानचा राधानगर यात सामील आहेत. या संदर्भात ट्विटर वरून पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्री भूपेन यादव यांनी ही माहिती शेअर केली आहे.

या यादीत स्पेन मधील ५६६, ग्रीस मधील ५१५, फ्रांस मधील ३९५ किनारे आहेत. येथे प्रदूषण स्तर कमी आहेच पण पाण्याची गुणवत्ता, संरक्षण, सुरक्षा सेवा उत्तम आहे.