देशात काल दिवसभरात 26,115 कोरोनाबाधितांची नोंद, तर 252 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशात पाच दिवसांनंतर 30 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात 26,115 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 252 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच 34,469 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ उतार अद्याप कायमच आहे. राज्यामध्ये काल दिवसभरात 2583 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली तर 3836 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 40 हजार 723 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.18 टक्के आहे. राज्यात सध्या 41672 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात काल (सोमवारी) 2583 नवीन रुग्णांचे निदान झाले तर राज्यात काल 28 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

तर गेल्या 24 तासात मुंबईत 419 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 447 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,19,394 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 31 हजार 880 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. गेल्या 24 तासात मुंबईत पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4595 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1194 दिवसांवर गेला आहे.