काल पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अखेर जामीन मंजूर झाला. न्यायालयाने सोमवारी राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थोर्पे यांचा जामीन मंजूर केला. पोलिसांनी सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात आपल्याविरोधात एकही पुरावा नसून आपला या प्रकरणात सक्रीय सहभाग असल्याचाही पुरावा नसल्याचा दावा राज कुंद्राने न्यायालयात केला होता. या प्रकरणात आपल्या विनाकारण गोवण्यात आल्याचा दावाही त्याने जामीन अर्जात केला होता. दरम्यान न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी राज कुंद्रा जेलमधून बाहेर आला आहे.
अखेर दोन महिन्यांनी आर्थर रोड जेलबाहेर राज कुंद्रा
राज कुंद्राची तब्बल ६२ दिवसांनी न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. सकाळी ११.३० वाजता राज कुंद्राची आर्थर रोड जेलमधून सुटका करण्यात आल्याची माहिती जेलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.राज कुंद्रा जेलमधून बाहेर पडल्यानंतर माध्यमांनी त्याला घेराव घेतला होता.
न्यायालयाने राज कुंद्राला ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन यांना पोलिसांनी १९ जुलैला अटक केली होती. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाने राज कुंद्राविरोधात एस्प्लेनेड न्यायालयासमोर 1500 पानी पुरवणी आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रात शिल्पा शेट्टीसह ४३ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.