एमी पुरस्कार सोहळ्यात ‘टेड लास्सो’ आणि ‘द क्राउन’ या शोला सर्वाधिक पुरस्कार


टेलीव्हिजन अकादमीकडून देण्यात येणारा एमी पुरस्कार हे टीव्ही क्षेत्रातील मानाचा पुरस्कार समजला जातो. नुकताच एमी अवॉर्डसचा शानदार सोहळा लंडनमध्ये पार पडला आहे. हा पुरस्कार सोहळा गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे व्हर्च्युअल स्वरुपात पार पडला होता. पण यंदाचा एमी पुरस्कार २०२१ हा सोहळा मोठ्या धुम-धडाक्यात पार पडला आहे. हा सोहळा लॉस एंजेलिसमध्ये १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पार पडला.

‘टेड लास्सो’ या शोला यंदाच्या एमी पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक नामांकन मिळाले होते. ‘टेड लास्सो’ आणि ‘द क्राउन’ या शोला या पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर पुरस्कार सोहळ्यात ‘हैक्स’ने देखील आपली छाप सोडली. जीन स्मार्टला कॉमेडी अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला तर मुख्य विनोदी भूमिकेसाठी अभिनेता जेसन सुडेकिसने पुरस्कार पटकावला आहे.

२०२१ सालातील एमी पुरस्कार विजेत्यांची यादी:

 • आउटस्टॅडिंग सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस इन ड्रामा सीरिज : गिलियन एंडरसन (द क्राउन)
 • आउटस्टॅडिंग सपोर्टिंग अ‍ॅक्टर इन ड्रामा सीरिज : टोबीज मेन्जीस (द क्राउन)
 • आउटस्टॅडिंग सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस इन एंथोलॉजी सीरिज/ फिल्म : जुलिएन्ने निकोलसन (Mare of Easttown)
 • आउटस्टॅडिंग सपोर्टिंग अ‍ॅक्टर इन एंथोलॉजी सीरिज/ फिल्म : इवन पीटर्स (Mare of Easttown)
 • आउटस्टॅडिंग राइटिंग फॉर कॉमेडी सीरिज : लूसिया, पॉल आणि जेन स्टैस्की (हैक्स)
 • आउटस्टॅडिंग डायरेक्टिंग फॉर कॉमेडी सीरिज : लूसिया (हैक्स)
 • राइटिंग कॉमेडी सीरीज : हैक्स
 • आउटस्टॅडिंग राइटिंग फॉर ड्रामा सीरिज : पीटर मॉर्गन (द क्राउन)
 • आउटस्टॅडिंग डायरेक्टिंग फॉर ड्रामा सीरिज : जेस्सिकाा होब्स (द क्राउन)
 • आउटस्टॅडिंग कॉमेडी सीरिज: टेड लास्सो
 • आउटस्टॅडिंग ड्रामा सीरिज: द क्राउन