किरीट सोमय्यांच्या रडारवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार


मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करण्याचा सपाटाच लावला आहे. आधी अनिल परब, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर सोमय्या यांच्या रडारवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आले आहेत. कराडमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी म्हटले की, गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला मी भेट देणार आहे, तिथेही असाच घोटाळा आहे. उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये 19 बंगल्यांचा घोटाळा केला आहे, त्याची पाहणी करण्यासाठी पुढच्या सोमवारी 27 तारखेला जाणार आहे. तर 30 तारखेला अजित पवारांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर हा विकत घेतला, त्याची पाहणी करणार आहे. त्यावेळीही मला रोखणार आहे का? असा सवाल देखील सोमय्या यांनी केला आहे.