करुणा शर्मा जामीन प्रकरणाचा उद्या निकाल


बीड : करुणा शर्मा यांच्या प्रकरणावर राज्याचे लक्ष लागले होते. अंबाजोगाई सत्र न्यायालयात आज न्यायमूर्ती एस.एस. सापटनेकर यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली आहे. करुणा शर्मा यांच्या जामीन प्रकरणी निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. उद्या शर्मा यांच्या जामीन अर्जावरील झालेल्या सुनावणीवर निकाल येणार आहे. यावेळी करुणा शर्मा यांनी पुन्हा बीड जिल्ह्यात येऊन अशा प्रकारचा कृत्य करू नये, अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली.

या प्रकरणावर आता न्यायालय न्यायालय उद्या निकाल देणार आहे. त्यामुळे करुणा शर्मा यांचा पुन्हा एकदा कारागृहात मुक्काम वाढला आहे. आज शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी झाली असून याचा निकाल न्यायालयाने राखीव ठेवला आहे. हा निकाल न्यायालय उद्या देणार असल्याची माहिती, करुणा शर्मा यांचे वकील ऍड.जयंत भाराजकर यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे.

राज्यात चर्चेत असणाऱ्या करुणा शर्मा प्रकरणी, अंबाजोगाई सत्र न्यायालयात न्यायमूर्ती एस.एस. सापटनेकर यांच्यासमोर आज सुनावणी झाली आहे. यावेळी दोन्ही पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करून आपापली बाजू मांडली आहे. मात्र यावरील निकाल न्यायालयाने राखीव ठेवला आहे. त्यामुळे हा निकाल उद्या होणार असून आता न्यायालय काय निकाल देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीडमधील परळी शहरात करुणा शर्मा दाखल झाल्या. त्यावेळी त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. करुणा शर्मा परळीमध्ये दाखल झाल्यानंतर वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवले. तसेच घेराव घालण्याचा प्रयत्न केला. वैजनाथाच्या दर्शनासाठी करुणा मुंडे पोहोचल्या, पण या ठिकाणी आमच्या साहेबाला बदनाम करायला आला आहात का? असा सवाल करत परळीच्या महिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांच्या त्यांच्या गाडीत पिस्तुल सापडल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मला फसवायचा प्रयत्न करत आहेत.

त्यांनीच माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉल्व्हर ठेवली, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला होता. त्यांना परळी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना अटक केल्यानंतर जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या ड्रायव्हरलाही एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर शर्मा यांनी जामिनासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. ज्यावर आज सुनावणी पार पडली असून न्यायालयाने निकाल राखीव ठेवला आहे.