फक्त दोन जागीच फुलतो हा दुर्मिळ गुलाब

जगात अनेक प्रकारची फुले आहेत. फुलांचा राजा गुलाब. गुलाबाच्या शेकडो जाती जगभरात फुलतात हे खरे असले तरी अतिशय दुर्मिळ म्हटला जाणारा ‘मिडिलमिस्ट रेड कॅमोलीया’ या जातीचा गुलाब मात्र जगात फक्त दोन ठिकाणीच फुलतो. त्यातील एक आहे ब्रिटन आणि दुसरे आहे न्यूझीलंड. दुर्मिळ असल्याने या गुलाबाची किंमत सुद्धा प्रचंड आहे.

उन्हाळी गुलाब प्रकारातील हे फुल जॉन मिडिलमिस्ट नावाच्या व्यक्तीने १८०४ साली चीन मधून इंग्लंड मध्ये आणले पण आज घडीला चीनमधून हा गुलाब गायब झाला आहे. या व्यक्तीच्या नावावरूनच मिडिलमिस्ट रेड नाव दिले गेले. हा गुलाब फक्त श्रीमंताच्या घरीच दिसू शकतो याचे कारण त्याची किंमत.

मिडिलमिस्टने हा गुलाब कियू गार्डनला डोनेट केला होता पण तेथूनही तो नाहीसा झाला होता. १८२३ मध्ये इंग्लंडच्या चीस्वीक हाउस गार्डन मध्ये तो फुलू लागला. न्यूझीलंड पर्यंत हा गुलाब कसा पोहोचला त्याची माहिती मिळत नाही. पण गेली २०० वर्षे तो न्यूझीलंडच्या वॅतांगी ट्रीटी हाउस मध्ये तो फुलतो आहे.

ब्रिटनतर्फे हा गुलाब नुकताच सौदी अरेबियाच्या रियाध मध्ये पाठविला गेला आहे. हा गुलाब कोण खरेदी करतो याची प्रथम माहिती मिळविली जाते असेही समजते. चिस्विक हाउसचे माळी जेराल्डीन सांगतात, या घराचे मालक ड्युक ऑफ डेबोनशायर यांनी २० वर्षापूर्वी जेव्हा फुले विकली तेव्हा एका फुलाला ३ लाख रुपये किंमत मिळाली होती. हे फुल प्रथमच सौदीला पाठविले गेले आहे.