पिंक  आयफोन १३ साठी दिसली दिवानगी

आयफोन १३ च्या पिंक कलर व्हर्जन साठी युजर्स क्रेझी झाल्याचा अनुभव आला आहे. अॅपल इंकने १४ सप्टेंबरला आयफोन १३ सिरीजची घोषणा करून प्रीसेलची सुरवात १७ सप्टेंबरला केल्यावर प्री सेल पूर्वीच सेल्स आउटलेट मध्ये लाखो अपॉइंटमेंट नोंदल्या गेल्या होत्या. त्यावरून आयफोन १३ पिंक रंगाच्या व्हर्जनला प्रचंड मागणी आल्याचे स्पष्ट झाले आहे. टीमॉल प्लॅटफॉर्मवर फक्त ३ मिनिटापेक्षा कमी वेळात या व्हर्जन साठी ट्रॅकिंग झाल्याचे लक्षात येताच कंपनीने रातोरात टीमॉल फ्लॅगशिप स्टोर मध्ये भरपाई केली आणि त्यानंतर पुन्हा त्याची विक्री सुरु झाली असे समजते. १६ सप्टेंबरला टीमॉल मध्ये ३० लाखाहून अधिक अपॉइंटमेंट आयफोन १३ सिरीज साठी होत्या. त्यात पिंक कलर व्हर्जनचा सर्वाधिक सर्च होता. महिला आणि युवकांची संख्या त्यात अधिक आहे असेही सांगितले जात आहे.

टीमॉल हे अॅपलचे फ्लॅगशिप स्टोर थेट अॅपल कडून संचालित केले जाते. येथे विकले जाणारे सर्व आयफोन, आयपॅड, मॅक व अन्य प्रॉडक्ट खात्रीशीर आणि मान्यताप्राप्त मानले जातात. येथे अन्य स्टोरच्या तुलनेत अधिक उत्पादने विक्रीसाठी असतात आणि येथे विक्रीपश्चात सेवा सुद्धा दिली जाते.