तांदूळ निर्यातीत भारताची आघाडी

भारत २०२१ मध्ये जगभरातील तांदूळ निर्यातीतील ४५ टक्के तांदूळ निर्यात करणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तांदूळ निर्यातीत सध्या भारत टॉपवर आहे. २०२१ च्या सुरवातीच्या सात महिन्यात १२.८४ दशलक्ष टन निर्यात झाली असून आगामी काळात ती २२ अब्ज टनांवर जाईल असे समजते.

भारताची ही निर्यात तांदळाचे मोठे निर्यातक देश थायलंड, व्हिएतनाम,पाकिस्तानच्या एकूण निर्याती एवढी आहे. हे तीन देश मिळून २२ अब्ज टन तांदूळ निर्यात करतात. भारत कृषिप्रधान देश आहे आणि मोदी सरकारने कृषी प्रोत्साहनासाठी अनेक पावले उचलली तसेच शेतकऱ्यांची कमाई वाढावी यासाठीही अनेक पावले उचलली, निर्यात सुलभ व्हावी यासाठी अनेक बंदरांची क्षमता वाढविली गेल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. भारताच्या तांदूळ ग्राहकात अन्य देशांबरोबर चीन, व्हिएतनाम आणि बांग्ला देश हेही सामील आहेत.

ओलम इंडिया तांदूळ व्यवसायाचे उपाध्यक्ष नितीन गुप्ता, रॉयटर ला माहिती देताना म्हणाले, यावर्षी चीन, व्हिएतनाम भारताकडून मोठ्या प्रमाणावर तांदूळ खरेदी करत आहेत. चीन जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश आहे त्यापाठोपाठ भारत दोन नंबरवर आहे. भारतातून आफ्रिका, आशियाई देशात तांदूळ निर्यात होतो. तांदूळ निर्यातीचे मुख्य केंद्र आंध्रप्रदेश मधील मुख्य बंदर काकीनाडा येथे आहे. गतवर्षी येथे खूप गर्दी मुळे काही देशांनी अन्य देशांकडून तांदूळ आयात केला मात्र यंदा निर्यात सुलभ व्हावी म्हणून या बंदराशेजारी आणखी एका बंदरातून तांदूळ निर्यात परावानगी दिली गेली आहे. बासमती बरोबरच अन्य जातीच्या तांदळाला मोठी मागणी आहे.