का बरे असाच असतो वकिलांचा पोशाख?


तुम्ही अनेकदा वकीलांना बघुन विचार करत असाल की, हे वकील नेहमी काळा कोट आणि पांढरा शर्टच का घालतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का वकील दुसऱ्या रंगाचा कोट न घालता काळ्या रंगाचा कोट आणि पांढरा शर्टच का घालतात. ही कोणतीही फँशन नसून, यामागे मोठे कारण आहे.

वकालितीची सुरूवात 1327 मध्ये एडवर्ड तृतीयने केली होती  आणि त्याकाळी वेशभुषेच्या आधारावर त्यांचे कपडे तयार करण्यात आले. त्याकाळी न्यायाधीश डोक्यावर केसांचा विंग घालत असे.

वकीलीला सुरूवातीला 4 टप्प्यांमध्ये विभाजित करण्यात आले होते. ते विद्यार्थी, प्लीडर (वकील), बेंचर आणि बँरिस्टर असे होते. हे सर्व न्यायाधिशांचे स्वागत करायचे.

त्याकाळी न्यायालयात सोनेरी लाल कपडे आणि तपकिरी रंगाचे कपडे घातले जात असे. त्यानंतर वर्ष 1600 मध्ये वकीलांच्या कपड्यांमध्ये बदल आला आणि 1637 मध्ये प्रस्ताव आला की, काउंसिलला लोकांना अनुसरून कपडे घालायला हवे. त्यानंतर वकीलांनी लांब गाउन घालण्यास सुरूवात केली.

वर्ष 1964 मध्ये ब्रिटनची महाराणी क्वीन मैरीचा चिकन पॉप्सने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पती आणि राजा विलियम्स यांनी सर्व न्यायाधीश आणि वकिलांना सार्वजनिक रित्या शोक व्यक्त करण्यासाठी काळे गाउन घालून येण्याचे आदेश दिले. त्यानंतर आजपर्यंत ही प्रथा सुरूच आहे.

आता काळा कोट वकिलांची ओळख बनले आहे. अधिनिय 1961 अंतर्गत न्यायालयात पांढऱ्या टाईबरोबर काळा कोट घालून येणे अनिवार्य आहे.  असे म्हटले जाते की, काळा कोट आणि पांढरा शर्ट वकिलांमध्ये शिस्त आणतो आणि त्यांच्यामध्ये न्यायाच्या प्रती विश्वास जागवतो.

Leave a Comment