जेसीबी मशीनचा रंग पिवळाच का असतो ?


जेसीबी मशीन तर तुम्ही बघितली असेलच. याचा वापर जगभरातील अनेक ठिकाणी होतो. सर्वसाधारणपणे जेसीबीचे काम खोदकाम करणे हे असते. काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर जेसीबी भलत्याच कारणावरून ट्रेंडिग देखील होती. मात्र तुम्हाला माहिती आहे का जेसीबीचा रंग पिवळाच का असतो?

जेसीबीच्या रंगाआधी मशीनबद्दल जाणून घेऊया. जेसीबी ही ब्रिटनची मशीन बनवणारी कंपनी आहे. त्याचे मुख्यालय इंग्लंडच्या स्टैफर्डशायर येथे आहे. तर याचा प्लँट जगभरातील 4 उपखंडांमध्ये आहे.

जेसीबी ही 1945 मध्ये विना नावाचीच लाँच करण्यात आली होती. बनवणाऱ्यानी नावाविषयी खूप विचार केला मात्र त्यांना नाव सापडले नाही. अखेर त्यांनी याचा अविष्कार करणाऱ्या ‘जोसेफ सायरिल बमफोर्ड’ यांच्या नावावरून ठेवण्यात आले.

जेसीबी ब्रिटनची पहिली खाजगी कंपनी आहे, जिने भारतात फॅक्ट्री सुरू केली होती. आज देखील संपुर्ण जगात जेसीबीची सर्वाधिक निर्यात भारतातच केली जाते.

1945 मध्ये जोसेफ सायरिल बमफोर्ड यांनी पहिली एक सामान ओढणारी मशीन टीपिंग ट्रेलर बनवली होती. त्यावेळी त्याची विक्री 45 पौंडमध्ये झाली होती.

जगातील सर्वात जलद ट्रँक्टर फास्ट्रँक जेसीबी कंपनीनेच 1991 मध्ये बनवला. या ट्रँक्टरचा स्पीड सर्वाधिक 65 किलोमीटर आहे. या ट्रँक्टरला ‘प्रिंस ऑफ वेल्स’ पुरस्कार देखील मिळाला आहे.

तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र 1948 मध्ये जेसीबी कंपनीत केवळ 6 लोक काम करत असे. मात्र आज या कंपनीत 11 हजार कर्मचारी काम करतात.

सुरूवातीला जेसीबी मशीनला पांढरा अथवा लाल रंगा देण्यात येत असे. मात्र नंतर त्याचा रंग पिवळा करण्यात आला. यामागे तर्क हा देण्यात येतो की, जेणेकरून जेसीबी खोदकाम करत असलेली जागा लगेच दिसून येईल. रात्र असो अथवा दिवस लोकांना सहज लक्षात येईल की, येथे खोदकाम चालू आहे.

Leave a Comment