एकदा तरी गुगलला विचारुन पहा ‘कितने आदमी थे’!


आपल्या सर्वांनाच माहिती आहेच जगातील सर्वात मोठे जाएंट सर्च इंजिन म्हणून ‘गुगल’ची ओळख आहे. जगात अशी कोणतीच गोष्ट नाही, जी गुगलपासून लपून राहिली असेल. आता पुन्हा एकदा या गोष्टीवरुन त्याची प्रचिती आला. कारण गुगल आता पूर्णत: देसी झाले आहे. तुम्ही गुगलच्या सर्च बॉक्समध्ये ‘शोले’चा लोकप्रिय संवाद टाईप केला. तर तुम्हाला गुगल काही क्षणातच त्याचे उत्तर देतो.

जर तुम्ही गुगलच्या सर्चबॉक्समध्ये ‘कितने आदमी थे’ असे टाईप केले. तर, लगेचच कॅल्क्युलेटरमध्ये ‘२’ ही संख्या पहिल्यांदा दिसते. लोकप्रिय असलेल्या ‘शोले’ चित्रपटाला नुकतीच ४४ वर्षे पूर्ण झाली आहे. या चित्रपटाच्या आठवणीत दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी एक ट्विट केले होते. गब्बरच्या तोंडी या चित्रपटात असलेला हा डायलॉग आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. या चित्रपटातील संवादांवर सोशल मीडियावरही भरपूर मिम्स तयार केले गेले आहेत. तसेच, यातील पात्र, आजही प्रेक्षकांच्या मनात रुजलेली आहेत. त्यामुळेच गुगलही आता ‘कितने आदमी थे’चे उत्तर देताना दिसतो.

Leave a Comment