हे आहेत सर्वाधिक व सर्वात कमी झोपणारे जीव


मनूष्य न जेवता अनेक दिवस राहू शकतो, मात्र न झोपतो तो राहू शकत नाही. मनुष्य आपल्या आयुष्यातील एक तृतियांशा वेळ हा झोपण्यासाठी घालवतो. मनुष्यासाठी 8 तासांची झोप पुरक असते. मात्र काही लोक खूप वेळ झोपतात तर काही लोक 4-5 तासच झोपतात. मात्र प्राण्यांमध्ये अनेक तास झोपण्याची क्षमता असते तर काही प्राणी अगदी मोजक्याच मिनिटांसाठी झोपतात. आज आम्ही तुम्हाला अशाच प्राण्यांबद्दल सांगणार आहोत.

या प्राण्याचे नाव नाइट मंकी आहे. याचे डोळे घुबडाप्रमाणे असतात तर शरीर हे माकडाप्रमाणे आहे. यामुळे हा प्राणी रात्रीचा देखील सहज बघू शकतो. हे प्राणी अधिकत्तर पनामा आणि दक्षिण अमेरिकेत दिसतात. नाइट मंकी 24 तासांपैकी 17 तास झोपतात.

जगभरात सापांच्या 2500 प्रजाती आहेत. ज्यामध्ये अजगर सर्वाधिक लांब आणि खतरनाक असतील. आजगर हे 24 तासांमध्ये 18 तास झोपतात.

दक्षिण अमेरिका आणि उत्तर अर्जेटिंनामध्ये विशालकाय आर्माडिला पाहायला मिळतात. हे प्राणी 24 तासांमध्ये 18.1 तास झोपतात.

हे वटवाघळं उत्तर अमेरिकेमध्ये दिसतात. हे जीव 24 तासामध्ये 19.9 तास झोपतात.

या प्राण्याचे नाव कोआला असून, हे एक प्रकारे अस्वला सारखेच दिसते. हा जगातील सर्वाधिक झोपणारा प्राणी आहे. तो 24 तासांपैकी 22 तास झोपेतच असतो.

जिराफला तर तुम्ही प्राणीसंग्रहालयात अनेकवेळा पाहिले असेल. तुम्हाला आश्चर्यवाटेल मात्र जिराफ एकावेळी केवळ 5 मिनिटं झोपतो तर 24 तासांमध्ये तो केवळ 30 मिनिटंच झोपेत असतो.

Leave a Comment