किस करा आणि मानसिक तणावाला दूर पळवा


आपण कितीही शब्दात मांडायचा प्रयत्न केला तरी मांडू शकत नाही अशी स्वर्गीय गोष्ट म्हणजे प्रेम. प्रेम हे खूप भावनिक असते. त्याचा प्रेमाचा स्पर्श प्रत्येकाला हवाहवासा असतो. प्रेम स्पर्शाशिवाय व्यक्त होत नाही. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकदा लोक किस करतात.

तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे किस करून तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. जसे लहान मुलांच्या डोक्यावर किंवा गालावर किस केले जाते. त्याचबरोबर अनेक संशोधनामध्ये ही गोष्ट समोर आली आहे की, फक्त कॅलरीच बर्न होत नाहीत तर किस केल्याने प्रेम, जवळीक आणि आकर्षणही वाढते. त्याचबरोबर मानसिक तणावही दूर होते.

मानवी संस्कृतीची प्राचीन काळी जेव्हा सुरुवात होत होती, लोक तेव्हा एकमेकांबद्दलचं प्रेम दाखवायला चुंबनाचीच मदत घ्यायचे. त्यामुळे भावनिकरित्या लोक एकमेकांसोबत जोडले जायचे.

किसचे अनेक फायदे शास्त्रज्ञांनीही सांगितले आहेत. वेस्टर्न जनरल ऑफ कम्युनिकेशनमध्ये 2009 साली प्रकाशित झालेल्या ‘Affection exchange theory’ मध्ये याबद्दलचा उल्लेख करण्यात आला आहे. जेव्हा पार्टनरला किंवा प्रिय व्यक्तिला आपण किस करतो तेव्हा आपल्या शरीरात असे हार्मोन तयार होतात ज्यामुळे मानसिक तणाव दूर होतो.

प्रेमात आकंठ बुडालेले लोक जेव्हा एकमेकांना किस करतात तेव्हा ऑक्सीटोसि हार्मोन शरीरात तयार होतात. लव्ह हार्मोनही याला म्हटले जाते. त्यामुळेच जोडीदाराबद्दलचे प्रेम आणि जवळीक किस केल्यानंतर अजून वाढते. डोपामाइन हार्मोन शरिरात किसमुळे तयार होते. लोक या हार्मोनमुळे आनंद आणि समाधानाचा अनूभव घेतात. याशिवाय किस केल्यामुळे माणूस तणावमुक्तही होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment